- दोन दिवसांपुर्वीच चिमुकली बचावली
- नागरीकांचा ग्रा.पं. प्रशाषणावर रोष
- परीसरातील तलाव खोलीकरणाबाबद गज्जु यादव यांची आगेकुच
रामटेक – राजु कापसे
काल रात्री ६ ऑगस्ट रोजी झालेल्या धो धो पावसामुळे ग्रामपंचायत शितलवाडी (परसोड़ा) अंतर्गत येणाऱ्या अनेक वार्डात मोठ्या प्रमाणात पाणि साचुन येथे पुरस्थीतीसारखे दृष्य निर्माण होते. अशी परीस्थिती जवळपास प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात येथे होत असुन नागरीक या बाबद ग्रा.पं. शितलवाडी प्रशाषणाच्या कार्यप्रणालीबाबद रोष व्यक्त करीत असतात हे येथे विशेष.
काल झालेल्या पावसामुळे शितलवाडी परीसरातील गुरुकुलनगर, शिवनगर, गौरवनगर या भागात पुरस्थिति निर्माण झाली होती. येथील रहीवाशी राहुल पेटकर गुरुजी यांच्या घराच्या आतपर्यंत पावसाचे पानी शिरून साचले होते. दरम्यान यावेळी माजी पंचायत समीती उपसभापती गज्जु यादव हे काही नागरीकांसह येथे पोहोचले व परीसरातील परिस्थितीची पहाणी करून लोकांच्या समस्या जाणुन घेतल्या.
मागील अनेक वर्षापासून ह्या परसोड़ा शिवारालगत असलेल्या मानापुर व मौजा-रामटेक अंतर्गत येणारे पान-बरेजा संस्थांचे तलावांचे पुनरुज्जीवन, खोलिकरण करून तलावांची पानी समावून घेण्याची क्षमता वाढविने आवश्यक आहे. तेव्हा त्याअणुषंगाने माजी पंचायत समीती उपसभापती गज्जु यादव यांनी याविषयी पुढाकार घेत लवकरच ते सदर विषयाच्या अनुषंगाने प्रशासना सोबत बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी माहीती देतांना सांगीतले.
यावेळी त्यांच्यासोबत रणवीर यादव, शांतनु बावनकुळे, शुभम बावनकुळे, बालू बघेले, हरिओम यादव, दादू धमगाये, अतुल दानव यांचेसह स्थानिक श्री राहुल पेटकर गुरुजी, श्री कोसेकर गुरुजी, श्री गुल्हाने गुरुजी, श्री मनोहर बावनकुळे, श्री भिलावे गुरुजी इत्यादी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वीच बचावली चिमुकली, नागरिकांमध्ये संताप
ग्रामपंचायत शितलवाडी अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ३ मधील रहीवाशी धिरज खरवडे यांची अडीच वर्षीय चिमुकली घरासमोरील नालीच्या पाईप मधुन वाहुन जातांना शेजाऱ्याच्या लक्षात आल्याने व त्याच्या प्रसंगावधानाने सुदैवाने बचावली. ही घटना शुक्रवार च्या ५ ऑगस्ट ला सकाळच्या सुमारास घडली.
नित्या खरवडे असे बचावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या थरारक घटनेमुळे येथील ग्रामस्थ ग्रा.पं. प्रशाषणाविरोधात चांगलेच भडकले होते. ग्रामस्थांनी घटनेनंतर थेट ग्रामपंचायत शितलवाडी ( परसोडा ) कार्यालय गाठत प्रशाषणाला धारेवर धरत जाब विचारला व यानंतर थेट पोलीस स्टेशन गाठले होते. मात्र चिघळणारी परिस्थिती पाहुन जमावाला शांत करण्यात आले.