मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीच्या घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्याकडून काल रात्री उशिरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या नवनीत राणा यांचा अप्रत्यक्ष विरोध असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आल्याने आता या मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली आहे. तर अमरावती जिल्ह्यातून प्रथमच दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे यांची शिवसेना असलेल्या माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना देण्यात आल्याने आता महायुतीचे स्टार प्रचारक नवनीत राणा ह्या कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघात जातील का हा प्रश्न इथे उपस्थित होते.
दर्यापूर विधानसभा मतदारसंघात आता पार्सल चालणार नाही असा स्थानिक नागरिकांचा सुर होता. तसाच सूर भाजपच्या स्टार प्रचार माजी खासदार नवनीत राणा यांचाही होता. या विरोधाला झुगारून महायुतीतील घटक पक्षाने आपला उमेदवार येथे दिला असल्याने आता महायुतीची जागा धोक्यात आली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तर कॅप्टन अभिजीत अडसूळ हे याच मतदारसंघात एकदा निवडून आले होते, त्यानंतर हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला होता तर मागील पाच वर्षे हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात आला होता. या मतदारसंघात काँग्रेसचे सध्या वर्चस्व असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेस कडूनही पार्सल उमेदवार देणार असल्याचं समजल्याने दोन्ही पार्सलच्या मधात तिसरा बाजी मारणार काय हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 22, 2024
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc… pic.twitter.com/0rBkOkMTMU
लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचे काही जागांवरती शेवटपर्यंत उमेदवार ठरले नव्हते. त्यामुळे त्याचा मोठा फटका महायुतीला बसला होता. त्याच चुकीतून सावरुन महायुतीने जागावाटपाचा निर्णय घेत उमेदवारही निश्चित केले आहेत. महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरु आहे. असं असलं तरी तीनही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडूनही उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. अखेर शिवसेनेकडे उमेदवारांची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत उमेदवारांची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.