Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayशिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे अडचणीत...जुने व्हिडिओही व्हायरल...काय प्रकरण आहे ते जाणून...

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे अडचणीत…जुने व्हिडिओही व्हायरल…काय प्रकरण आहे ते जाणून घ्या

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज लोकसभेत दिशा सालिअन प्रकरणी AU चा उल्लेख आदित्य ठाकरे असा केल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे शिवसैनिक चांगलेच संतापले असल्याने त्यांनी खासदार राहुल शेवाळे यांचे जुने मैत्रिणीसोबतचे video शोधून Twitter वर व्हायरल केले आहे.

खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धरून ठेवला. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी SIT चौकशीचे आदेश दिले असल्याने आता राहुल शेवाळे सुद्धा अडचणीत सापडणार असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण

राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप जुलै महिन्यात करण्यात आला होता. लग्नाचं आमिष दाखवून खासदार राहुल शेवाळे यांनी आपलं मानसिक आणि शारीरिक शोषण केलं असा आरोप दुबईतील एका व्यापारी महिलेने केला होता. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

दुबई येथे राहणाऱ्या एका महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. मी जेव्हा दुबईत असायचे तेव्हा खासदार मला दिल्लीच्या खासदार निवासात रात्री जेवणासाठी आमंत्रित करत असते. ऑक्टोबर २०२१ मध्ये, मी माझा आणि शेवाळे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. याविरोधात शारजाहमध्ये माझ्याविरोधात तक्रार दाखल केली गेली. मला अटक करण्यात आली. मी ७८ दिवस तुरुंगात काढले. एप्रिल २०२२ मध्ये साकीनाका पोलीस ठाण्यात संबंधित महिलेने राहुल शेवाळे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली होती. परंतु, त्याविरोधात कारवाई झाली नाही, असं या महिलेने सांगितलं होतं.

राहुल शेवाळे यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी अशी मागणी आज विरोधकांनी लावून धरली होती. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे राज्य सरकारला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: