Saturday, January 4, 2025
HomeMarathi News Todayशिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर…कोणतं खातं कोणाला मिळालं?…जाणून घ्या

शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर…कोणतं खातं कोणाला मिळालं?…जाणून घ्या

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झाल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्रातील नगरविकास, पर्यावरण, अल्पसंख्याक, वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आली आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ मंत्रालय देण्यात आले आहे. यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्याकडे शिक्षण आणि अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी, 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील शिंदे सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी झाला. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे नऊ आणि भाजपच्या कोट्यातून नऊ मंत्री करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्र्यांची संख्या 20 झाली आहे. शिंदे हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात कमी शिकलेले मंत्री आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.

इतर मंत्र्यांकडे देण्यात आलेली खाती पुढीलप्रमाणे…

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित – आदिवासी विकास

गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे – बंदरे व खनिकर्म

संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे – कामगार

संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत – उद्योग

तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार – कृषी

दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: