महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बऱ्याच घटना घडल्या आहेत, त्यातील महत्वाची शिवसेनेतील फूट…आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत आदित्य ठाकरेंनी मोठा खुलासा केला आहे. मातोश्रीवर आल्यानंतर एकनाथ शिंदे रडले, असा दावा आदित्यने केला आहे. भाजपसोबत न गेल्यास अटक करू, असे शिंदे यांनी सांगितले होते, असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हैदराबादच्या गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या परिसंवादात आदित्य ठाकरे यांनी बंडाआधी ‘मातोश्री’वर नेमकं काय घडलं ते सांगितलं. सोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे पुढे म्हणाले की, शिंदे तेथे आल्यानंतर खूप रडले आणि त्यांच्या चेहऱ्यावर भाजपबद्दल घबराट होती. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘हे 40 लोक पैशासाठी, त्यांच्या जागांसाठी गेले. तेव्हा विद्यमान मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन रडले. याचे कारण केंद्रीय तपास यंत्रणा त्याला अटक करणार होती.