अकोला : येणाऱ्या 2024 च्या निवडणूकीत विदर्भातील 11 जिल्हयातील शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते तथा तळागाळातील शेतकरी बांधव यांना विद्यमान सरकार कडून गेल्या कित्येक दिवसांपासून विदर्भातील तमाम जनतेला जो त्रास सहन करावा लागला त्या बद्दल तरूण शेतकरी बांधवांच्या मनात खुप मोठ्याप्रमाणात कलह निर्माण झाला. त्यामूळे आमच्या अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधव यांना मोठ्या प्रमाणात बदल घडवायचा आहे.
या सरकारमुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त आहेत, शेती मालाचे भाव पाडणारे सरकार, शेतीला शेत रस्ते न देणारे सरकार, सिंचन प्रकल्प पुर्ण न करणारे सरकार, ग्रामीण भागातील रस्ते व विकास निधी न देणारे सरकार, ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार न देणारे सरकार, असे सर्व महत्वाचे मुद्दे पुढे करुन हे सरकार पाडा असे धोरण निश्चितच शेतकरी बांधव अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसुन येत आहे.
विदर्भ राज्य वेगळं जो पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होणार नाही तो पर्यंत शेतकरी बांधव व विदर्भातील तमाम जनता सरकार पाडा असे धोरण निश्चितच आहे. असे आवाहन विदर्भातील तमाम जनता करीत आहे.
31 डिसेंबर 2023 पुर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य करण्यासाठी विदर्भातील तमाम जनता एकत्रीत येत आहे.
या पुढील आंदोलन तीव्र करायचे आहे.
02 ऑक्टोंबर चलो कौडण्यपुर महीला मेळावा. दुपारी 01 वाजता …रुक्मीणी मातेला साकडे घालून आंदोलन करण्यात येत आहे.