बाळापूर – सुधीर कांबेकर
बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार वाडेगाव येथील बाजार आवारात शेतकऱ्यांच्या सोईकरिता शासनाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन अंतर्गत १ कोटी ५३ लाख रूपये किमतीचे शेतकरी भवन उभरण्याचा निर्णय बाळापूर कृषीउत्पन्न बाज़ार समितीच्या संचालकमंडळाने घेतल्याची माहिती बाळापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती सेवकराम ताथोड यांनी बाळापूर कृषी उत्पन्नबाजार समितीच्या वार्षिकसर्वसाधारण सभेत दिली.
बाळापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उपसभापती राजेशराऊत व सर्व संचालकाच्या सचिव के.एस. नावकार, सर्व कर्मचांऱ्यांच्या सहकार्यामुळे सन २०२३-२०२४ या वर्षांत बाज़ारसमितीला चांगला नफाझाल्याचे सभापती सेवकराम ताथोड यांनी सांगितले. अगामी काळात समितीचे उपबाजार उरळबु. येथे नाफेडमार्फत तेलबिया व कडधान्य खरेदी केंद्र घेण्या करिता समितीचे प्रयत्न सुरू असल्याचेही सभापती ताथोड यांनी सांगितले.तत्पूर्वी बाजार समितीचे सभापती,उसभापती व संचालकांच्या हस्ते संत गजानन महाराजांच्याफोटोचे पूजन करण्यात आले. बाजार समितीचे सचिव के. एस.नावकार यानी अहवाल वाचनकेले.
बाळापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे संचालक रमेश ठाकरे यांनी संचालन व आभार मानले.वार्षिक सर्व साधारण सभेलाबाजार समितीचे उपसभापती राजेश राऊत, संचालक संदीपदादा पाटील, ज्ञानेश्वर माळी, रामभाऊ काळे, रामेश्वर पोहरे, रमेश ठाकरे, रवींद्र मुरूमकार, अनिता माळी, रेखा कराळे, धनंजय दांदळे, नितीन गव्हाणकर,गजानन वझिरे, राजेश्वर वैराळे.रवींद्र सरप, गुलाम नफीस गुलामनबी, लक्ष्मण सरप यांच्यासह तालुक्यातील सरपंच, सेवासहकारी संस्थेचे आध्यक्ष व व्यापारी अडते मापारी यांचेप्रतिनिधी मोठ्यासंख्पेने उपस्थित