Saturday, November 23, 2024
HomeAutoशेमा इलेक्ट्रिकने तीन हायस्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे अनावरण केले...

शेमा इलेक्ट्रिकने तीन हायस्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलरचे अनावरण केले…

ईगल प्लस, ग्रायफोन आणि टफ प्लस, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लॉन्च होण्याची शक्यता…

ओडिशातील तरुण मेक-इन-इंडिया ईव्ही उत्पादक शेमा इलेक्ट्रिकने ईव्ही इंडिया एक्स्पो २०२२मध्ये तीन नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या आकर्षक श्रेणीचे अनावरण केले. इंडिया एक्स्पो सेंटरमध्ये आयोजित केलेल्या ईव्ही एक्स्पोने, या ब्रँडच्या ईगल प्लस, ग्रायफोन आणि टफ प्लस या नवीन ऑफर दाखवण्यासाठी ब्रँडसाठी व्यासपीठ परिपूर्ण म्हणून काम केले.

ईगल प्लस (हाय स्पीड): या ब्रँडने, आपल्या श्रेणीचा विस्तार करत, हाय स्पीड श्रेणीतील नवीन ई-स्कूटर, ईगल प्लसचे अनावरण केले. ही ई-स्कूटर, ५० कि.मी. प्रतितास इतका वेग सहजतेने प्राप्त करू शकते आणि त्यामुळे स्थानिक प्रवासासाठी ती एक सोयीस्कर राइड बनते. ती एका पूर्ण चार्जवर १२० कि.मी.ची श्रेणी प्रदान करते. ही ई-स्कूटर, ३.५ ते ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकणाऱ्या १२०० वॅटच्या बीएलडीसी मोटर आणि 3.2 किलो वॅट आवर लिथियम-आयन बॅटरीद्वारे चालित आहे.

ग्रायफोन: हाय स्पीड श्रेणीतील या ब्रँडची आणखी एक ई-स्कूटर, कमाल ६० कि.मी. प्रतितास वेग देते आणि एका चार्जवर १३० कि.मी. अंतर कापते. या वाहनातील १५०० वॅटची बीएलडीसी मोटर आणि ४.१ किलो वॅट आवरची लिथियम-आयन बॅटरी ३.५ ते ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

टफ प्लस: एक्स्पोमध्ये अनावरण केलेली तिसरी ई-स्कूटर- टफ प्लस ही, ब्रँडद्वारे विशेषत: लास्ट माईल डिलिव्हरीसाठी हाय स्पीड रेंजमध्ये आणखी एक भर आहे. ही ई-स्कूटर ६० कि.मी. प्रतितास वेगापर्यंत पोहोचते आणि एका पूर्ण चार्जवर १३० कि.मी. धावू शकते. या वाहनातील १५०० वॅटची बीएलडीसी मोटर आणि ४ किलो वॅट आवर एलएफपी बॅटरी ३.५ ते ४ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.

सध्या, ब्रँडद्वारे आधीपासूनच चार कमी गतीची उत्पादने रस्त्यावर उतरवली आहेत. नवीन अनावरण केलेले ई-स्कूटर्स, अधिकृतपणे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे.

शेमा इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीओओ, श्री योगेश कुमार लथ म्हणाले, “जेव्हा संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग, चालू असलेल्या ई-मोबिलिटी मिशनमध्ये योगदान देण्यासाठी अथक परिश्रम करत आहे, तेव्हा या क्रांतीने भारतीय उत्पादकांना त्यांचे नावीन्यपूर्ण कार्य मांडण्यासाठी वाव दिला आहे. शेमा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या पातळीवर तडजोड न करणारी उत्पादने देण्याचा प्रयत्न करत आहोत.

आम्हाला जाणीव आहे की, ग्राहक अनुभव ही केवळ आमच्यासाठीच नाही तर देशासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आम्ही सर्व मिळून, आयसीई वरून ईव्हीकडे जबाबदारीने जाणार आहोत. ईव्ही एक्सपो इंडिया येथे, आम्हाला मागणी समजून घेण्यासाठी आणि आमचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ मिळाले आहे. आम्हाला आमच्या उत्पादन श्रेणीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, आम्ही नवीन उत्पादने लाँच केल्यानंतर आम्ही त्याचा फायदा घेऊ.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: