Saturday, November 23, 2024
Homeगुन्हेगारीमंत्रालयात दलाली करणाऱ्या शेखर भोयर आणि दिलीप खोडे यांना २५ लाखांची लाच...

मंत्रालयात दलाली करणाऱ्या शेखर भोयर आणि दिलीप खोडे यांना २५ लाखांची लाच घेतांना रंगेहात पकडले…

अमरावती – मंत्रालयात दलाली करणाऱ्या अमरावती येथील दोघांना 25 लाखांची लाच घेतांना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. श्री. दिलीप वामनराव खोडे वय 50 वर्ष, पद – टेक्नीशियन MIDC अमरावती.,शेखर भोयर, रा. अमरावती. असे कारवाई करण्यात आलेल्या दलालांची नावे असून आरोपी यांनी तक्रारदार यांचे विरूद्ध त्यांचे कार्यालयातील महिला अधीकारी यांनी दिलेल्या दोन तक्रारी मध्ये चौकशी थांबविणे साठी प्रत्येकी 50,00,000/- असे ऐकून 1 कोटी रुपयाची मागणी केली.

माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे विरुद्ध आमदार मा. श्री.वजाहत मिर्झा , विधान परीषद म. राज्य यांचे कडे तक्रारदार यांचे विभागातील महिला अधीकारी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये विधानपरिषद म.राज्य मध्ये प्रश्न उपस्थित न करणे व तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता दिनांक 28/03/2023 आरोपी यांनी दोन केसेस चे प्रत्येकी 50,00,000/- असे ऐकून 1 कोटी रुपयांची मागणी केली. दिनांक 28/03/2023 रोजी आलोसे यांनी तक्रारदारास तडजोडी अंती 25,00,000/- रु.ची लाच रक्कम मागणी करून आरोपी क्र.१ यांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

मार्गदर्शन : मा.श्री. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर
मा.श्री मधुकर गिते सर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र,

सापळा व तपासी अधिकारी :- श्री. सचिन वा. मत्ते . पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. नागपूर.

सापळा कार्यवाही पथक:- श्री. सचिन वा. मत्ते . पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. नागपूर.
श्री. निलेश उरकुडे, पोलिस निरीक्षक, श्रीमती प्रीती शेंडे, पोलिस निरीक्षक, नापोशी सुशील यादव, पंकज घोडके,पो.शी. हरीश गांजरे , बादल मांढरे, सूरज भोंगाडे चालक विनोद नायगमकर सर्व ला. प्र. वी.नागपूर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: