Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीचोरट्याने विहिरीत फेकलेल्या २५ ते ३० मोटरसायकली पोलिसांनी काढल्या बाहेर...शेगावच्या या चोरट्याचा...

चोरट्याने विहिरीत फेकलेल्या २५ ते ३० मोटरसायकली पोलिसांनी काढल्या बाहेर…शेगावच्या या चोरट्याचा प्रताप…Video

हेमंत जाधव,बुलढाणा

जिल्ह्यात गेल्या काही महीनांपासून दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. अश्यातच पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट मधील वसीम सय्यद इस्लाम (38) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चोरलेल्या दुचाकी शेगाव वरवट रोड वर एका विहिरीत फेकल्या आहेत अशी कबुली दिली.

त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून विहिरीतून अंदाजे 25 ते 30 दुचाकी बाहेर काढल्या चोरट्यांनी दुचाकींचा स्पेअरपार्ट्स आणि चाक काढून दुचाकी विहीरीत फेकल्या होत्या मुख्य आरोपीसह अजून काही आरोपी या टोळीत सहभागी असल्याचे समजते….

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: