Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Today'त्या' काम आटोपून घराकडे येत होत्या...आणि काळाने घात केला...७ महिलांचा जागीच मृत्यू...कर्नाटकातील...

‘त्या’ काम आटोपून घराकडे येत होत्या…आणि काळाने घात केला…७ महिलांचा जागीच मृत्यू…कर्नाटकातील बिदर येथील घटना…

कर्नाटकातील बिदर येथे झालेल्या भीषण ऑटो रिक्षा आणि ट्रकच्या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बिदरमधील एका गावातून महिला रात्री उशिरा ऑटोरिक्षाने घराकडे जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिला व्यवसायाने मजूर असल्याचे सांगितले जाते, त्या दिवसभर काम करून गावाकडे परतत होत्या. बिदरमधील बेमलाखेडा सरकारी शाळेजवळ ही घटना घडली.

स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, रात्री उशिरा या महिला ऑटो रिक्षातून काम संपवून घरी परतत होत्या. त्यानंतर बेमलाखेडा शासकीय शाळेजवळ अनियंत्रित ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. सात महिलांचा मृत्यू झाला आहे. पार्वती (४०), प्रभावती (३६), गुंडम्मा (६०), यदम्मा (४०), जगम्मा (३४), ईश्वरम्मा (५५) आणि रुक्मिणीबाई (६०) अशी त्यांची नावे आहेत.

दोन्ही वाहनांच्या चालकासह 11 जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: