Monday, December 23, 2024
Homeराजकीयशरद झांबरे पाटील यांनी 'पुढच्या लढाईसाठी' घेतले भाजप प्रदेशाध्यक्षांचे 'आशीर्वाद'...

शरद झांबरे पाटील यांनी ‘पुढच्या लढाईसाठी’ घेतले भाजप प्रदेशाध्यक्षांचे ‘आशीर्वाद’…

नागपुरात झाली भेट, पदवीधरांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा

अकोला- पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे वातावरण हळूहळू रंगायला लागले आहे. या निवडणुकीसाठी शरद झांबरे पाटील यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केलेली आहे. दरम्यान शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी त्यांनी नागपूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्याने या भेटीत आणि चर्चेत नेमके काय ठरले याबाबत पदवीधरांना उत्सुकता वाढलेली आहे.

शरद झांबरे पाटील यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केलेली आहे. या निवडणुकीसाठी त्यांनी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याकरिता मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळालेले आहे. शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी शरद झांबरे यांनी नागपूर येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अमरावती विभागातील पदवीधरांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढच्या लढाईसाठी आपण भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आशीर्वाद या भेटीत घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट आणि मार्गदर्शन प्रत्येक वेळी नवी ऊर्जा देणारे आणि समृद्ध करणारे असते, अशी प्रतिक्रिया देखील शरद झांबरे पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी आणि सविस्तर काय चर्चा झाली असावी याबाबत पदवीधर मतदारसंघात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

वास्तविक पाहता पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही पक्षाच्या नावाने लढविल्या जात नाही. तरीही भाजपकडून डॉ. रणजीत पाटील यांचे नाव या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्याचे सांगितले जाते. असे असताना भाजपचेच निष्ठावान कार्यकर्ते असलेले व कधीकाळी डॉ. रणजीत पाटील यांच्यासोबत काम केलेले शरद झांबरे पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी चालविलेली आहे. एक सामान्य व निष्ठावान कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातील युवक म्हणून आपल्याला संधी मिळावे अशी अपेक्षा त्यांनी या अगोदर व्यक्त केलेली आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही तरीही आपण निवडणूक लढवणार असेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान शनिवारी शरद झांबरे पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आपण पुढच्या लढाईसाठी साहेबांचे आशीर्वाद घेतलेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने पदवीधर मतदारसंघात उत्सुकतेसह नवनवीन चर्चा व्हायला लागल्या आहेत. शनिवारच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीनंतर शरद झांबरे पाटील यांनी आणखी जोमाने काम सुरू केल्याने या भेटीत नेमके काय झाले, याबाबत पदवीधरांमध्ये विविध चर्चा व्हायला लागल्या आहेत.
……………………………………….

नागपुर येथे आमचे मार्गदर्शक आणि नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांची भेट झाली. यावेळी अमरावती विभागातील पदवीधरांचे प्रश्न आणि समस्यांसंदर्भात आदरणीय बावनकुळेसाहेबांशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी माझ्या पुढच्या ‘लढाई’साठी साहेबांचे ‘आशिर्वाद’ घेतलेत. साहेबांची भेट आणि मार्गदर्शन प्रत्येकवेळीच नवी ‘ऊर्जा’ देणारी आणि समृद्ध करणारी असते. आदरणीय साहेब!, तुमचे आशिर्वाद माझ्यावर कायम असेच असु देत.

शरद पाटील झांबरे

……………………………………….

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: