Sharad Mohol Murder : गँगस्टर शरद मोहोळ याची त्याच्याच टोळीतील सदस्यांनी शुक्रवारी दिवसाढवळ्या पुण्यात गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर पुणे पोलिसांची गुन्हे शाखा सक्रिय झाली आणि पुणे-सातारा रस्त्यावर एका वाहनातून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह सात जणांना पोलिसांना अटक केली. गुन्हेगारांकडून तीन पिस्तूल आणि तीन मॅगझिनसह पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याचाच साथीदारच होता. मुन्ना आणि शरद मोहोळ यांच्यात आधी जमिनीच्या पैशातून वाद झाला होता. या वादातूनच मोहोळ याने मुन्नाला मारहाण केल्याची माहिती समजली आहे. या वादानंतरच मुन्ना याने मोहोळला संपवायचं ठरवलं असावं. आरोपी मुन्ना साथीदारांसह शरद मोहोळच्या घरी आला. शरद मोहोळचा लग्नाचा वाढदिवस असल्याने सर्वांनी घरीच जेवण केलं. त्यानंतर त्याचा गेम केला.
एक गोळी मोहोळ यांच्या छातीत घुसली तर दोन गोळ्या उजव्या खांद्याला लागल्या. कोथरूड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले .त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत अवघ्या आठ तासात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह सात जणांना पोलिसांना अटक केली.
खून, दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत
४० वर्षीय शरद मोहोळ याच्यावर खून, दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. गँगस्टर मोहोळ हा पुण्याच्या येरवडा तुरुंगात इंडियन मुजाहिदीनचा संशयित सदस्य मोहम्मद कतील सिद्दीकी याच्या हत्येप्रकरणी आरोपी होता, परंतु त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मोहोळच्या टोळीत जमीन आणि पैशांवरून वाद सुरू असल्याने त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हत्येचा तपास करण्यासाठी नऊ पथके तयार करण्यात आली आहेत.
टोळीयुद्धाची चर्चा गृहमंत्री फडणवीस यांनी फेटाळली
गँगस्टर मोहोळच्या हत्येवर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोळीयुद्धाच्या चर्चेचे खंडन केले. मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केल्याने हे टोळीयुद्ध नाही, असे तो म्हणाला. ते म्हणाले की, अशा कुख्यात गुन्हेगारांना कसे सामोरे जायचे हे आमच्या सरकारला माहीत आहे, त्यामुळे टोळीयुद्धात अडकण्याचे धाडस कोणी करू शकत नाही.
The Crime Branch Unit of Pune City police apprehended 8 accused in connection with the murder of Gangster Sharad Mohol. Police have also seized 3 pistols,3 magazines and 5 rounds. Further probe is on: Pune Police officials
— ANI (@ANI) January 5, 2024