Monday, December 23, 2024
Homeराज्यशरद जोशींची ७ वी जयंती साजरी...

शरद जोशींची ७ वी जयंती साजरी…

नरखेड – नरखेड तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने मु. देवळी ता.नरखेड,जि.नागपुर येथे श्री रामचंद्र बहुरूपी यांचे “निवासस्थानी” युगात्मा शरद जोशी यांची ७ वी जयंती पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नारायणराव बांदरे, प्रमुख उपस्थिती श्री.मदन कामडे, शंकरराव बहुरूपी, वामनराव जावळे, भिमराव सांबारे,प्रकाश दुहीजोड गुरूजी, कुर्वे गुरूजी, प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे म्हणून अनेक आंदोलने करून शेतकर्यांचे मरण हेच सरकारचं धोरण सांगुन शेतकर्यांना संघटीत करण्याचे काम देशभर करण्याचे काम या युगात्माने केल्यानेच आज शेतकरी संघटनेचा विचाराशिवाय देश व शेतकरी सुखी होऊ शकत नाही.शेतकर्यीनी संघटना मजबूत केल्याशिवाय शेतकरी व देश सुखी होऊ शकत नाही.ही आठवण यानिमित्ताने शेतकर्यांना होते आहे.या निमित्ताने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन रामचंद्र बहुरूपी यांनी ,आभार नरखेड तालुका अध्यक्ष श्री. वसंतराव वेद्य यांनी. केले.व आभार प्रदर्शन श्री.प्रमोद वघाळे सरांनी केले.व “अमर रहे अमर रहे शरद जोशी अमर रहेंच्या घोषणा देण्यात येऊन कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: