Monday, December 23, 2024
HomeSocial TrendingShahrukh Khan | शाहरुख खान दर्शनासाठी राम मंदिरात गेला होता?…व्हायरल व्हिडिओचे सत्य...

Shahrukh Khan | शाहरुख खान दर्शनासाठी राम मंदिरात गेला होता?…व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या…

Shahrukh Khan : राममंदिराचा प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला अयोध्येत मोठ्या उत्साहाने पार पाडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते, मात्र बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानला राम मंदिराला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आमत्रण नसून सुद्धा असे शाहरुख खान मंदिरात गेला?…हे आम्ही म्हणत नसून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हे सांगत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान मुलगी सुहाना खानसोबत मंदिरात जाताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आपली मुलगी सुहाना खानसोबत मंदिरात जाताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘शाहरुख राम मंदिरात आला आहे.’ व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले. निमंत्रण न मिळाल्यावरही शाहरुख राम मंदिरात पोहोचल्याने काही युजर्स आश्चर्यचकित झाले, तर काही यूजर्सने अभिनेत्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

व्हायरल व्हिडिओचे सत्य
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. शाहरुख खान अयोध्येला पोहोचलेला नाही, तर हा त्याचा जुना व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तो सुहाना खानसोबत मंदिरात जाताना दिसत आहे. वास्तविक, हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील तिरुपती श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील आहे, जिथे शाहरुख खान मुलगी सुहाना आणि अभिनेत्री नयनतारासोबत दर्शनासाठी आला होता.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: