राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष असा समजला जात होता. मात्र, या राष्ट्रवादी पक्षात काही भाजप प्रणित लोकांचा भरणा झाला असून ते हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याचा कोणत्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. अशातच मुर्तीजापुर विधानसभेसाठी इच्छुक असलेला बाहेर जिल्ह्यातून आलेला एक पार्सल उमेदवार हा भाजप व हिंदुत्वाची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट मागणारा उमेदवार याने चक्क मुस्लिमांना डिवचण्यासाठी शहनाज अख्तरचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘मुझे चढ गया भगवा रंग रंग’ या गाण्याने संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेली, निवडणुकीत भाजपचा चेहरा असलेली गायिका शहनाज हे भाजपाचा अजेंडा घेवून संपूर्ण देशात तिचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटात भाजपचा अजेंडा घेवून सामील झालेल्या एका पार्सल उमेदवाराने कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रम नेमका कशासाठी आयोजित केला आहे?, हे अनेकांना कळून चुकलं आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची तिकीट आपल्यालाच मिळावी यासाठी भाजपकडील हिंदू मतांना आकर्षित करून मुस्लीम मतदारांच्या प्रती द्वेष भावना ठेवून हा कार्यक्रम एका पार्सल उमेदवारांनी केला आहे. या प्रयोगाला पक्षाच्या वरिष्ठाची मान्यता आहे किवा नाही हे माहिती नसून शहरातील पार्सलचे सल्लागार, स्वयंघोषित नेत्याने असा सल्ला दिला असल्याची शहरात चर्चा आहे.
भाजप हा पक्ष हिंदुत्वाची विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. या पक्षा सोबत एक पक्ष हिंदुत्वाची विचारधारा घेऊन चालणारा होता तो म्हणजे शिवसेना पक्ष, मात्र त्या पक्षाची भाजपने काय अवस्था केली हेही सर्वश्रुत आहे. त्यातच राष्ट्रवादी भाजपच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे काही चिल्लर, स्वत:ला मोठे नेते समजणारे हे पक्षाची विचारधारा बदलून पाहण्याचा प्रयत्न करीत आहे. बरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आता भाजपच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला की काय?. त्यांनी चक्क भाजपची चेहरा असलेली लोक गायिका शहनाज अख्तर हिचा गायनाचा कार्यक्रम मूर्तिजापूर शहरात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला पक्षातील पुरोगामी विचारधारेचे नेते जमतील का?.
पार्सल नेता निवडणुकीतील ‘मांडवली’ची किंमत वाढवण्यासाठी?.
गेल्या दोन-तीन महिन्यात मुर्तीजापुर बॅनरवर अवतरलेला अमरावती जिल्ह्यातला हा नेता अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील एका युवा नेत्याचा खास मित्र आहे. या पार्सल च्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या इतर तगड्या उमेदवारांवर दबाव वाढवण्यासाठी या अमरावतीच्या पार्सल नेत्याचा उपयोग केला जात आहे. या पार्सल नेत्याच्या माध्यमातून ऐनवेळी सगळ्या उमेदवारांसोबत सेटलमेंट करून मांडवलीत मोठी रक्कम उकळण्याचा डाव शरद पवार गटातील युवा नेत्याचा असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे या पार्सल नेत्याचा सध्या सुरू असलेल्या लॉन्चिंग हा निवडणुकीत तगड्या उमेदवारांकडून अधिकाधिक पैसा उकळण्यासाठीचा प्रयत्न असल्याची चर्चा मूर्तिजापूर शहरात आहे.
भाजपची विचारधारा घेऊन बाहेर जिल्ह्यातून येऊन मुर्तीजापुर विधानसभेसाठी तिकीट मागणारा एक हिंदुत्ववादी चेहरा सध्या राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे. सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोठे नेतेही आपला अजेंडा कोणत्या न कोणत्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात तर आता या आयोजित कार्यक्रमामुळे त्यांचा हिंदुत्ववादी चेहरा उघड पडला आहे. या पार्सल उमेदवाराला शहरातील एक वरिष्ठ नेता जो स्वतःला शरद पवार समजतो त्याने चक्क एका बाहेर जिल्ह्यातील पार्सल उमेदवाराला आपल्या मांडीवर बसून त्यालाच तिकीट कसे मिळणार यासाठी असे कार्यक्रम आयोजित करण्याचे सांगतो. या नेत्याने त्याला उमेदवार म्हणून स्वतः घोषित करून त्याच्या माध्यमातून हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्याचे काम सुरू केले आहे. तर हा अजेंडा शरद पवार यांना पटणार का? किंवा शरद पवार यांच्या पक्षातील लोकांना पटणार का? तर हिंदुत्ववादी अजेंडा राबविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुस्लिम मतदान करणार का हा एक प्रश्न उपस्थित होतो. बाहेर जिल्ह्यातून भाजप पक्षातून आलेला पार्सल उमेदवाराच्या ओंजळीने बाकीचे नेते पाणी पिणार का?.