Thursday, December 26, 2024
Homeराज्यशाहीर शिशुपाल अतकरे महाराष्ट्र शाहीर भुषन पुरस्काराने सन्मानीत...

शाहीर शिशुपाल अतकरे महाराष्ट्र शाहीर भुषन पुरस्काराने सन्मानीत…

रामटेक – राजू कापसे

भारतीय कलाकार शाहिर मंडळ ऑल इंडिया भव्य शाहीर कलाकार मेळावा तसेच गुरुपुजा निमित्ताने श्रीराम जानकी मंगल कार्यालय कामठी येथे नुकताच दिनांक २२जुलै रोजी कार्यक्रम पार पडला. यात रामटेक तालुक्यातील खोडगाव येथील प्रसिद्ध शाहीर शिशुपाल अतकरे यांना महाराष्ट्र शाहीर भुषन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमात अनेक तालुका तसेच जिल्ह्यातून शाहीर कलाकार जमले होते. शाहीर बाळाभाऊ तसेच शिशुपाल अतकरे खोडगाव ( काचुरवाही ) यांचा गन गवळनीचा कार्यक्रम पार पडला तसेच यादरम्यान शाहीर राजेंद्र भिमराव बावनकुळे यांनी महाराष्ट्र शाहीर भुषन पुरस्कार देऊन खोडगाव ( काचुरवाही ) चे शाहीर शिशुपाल अतकरे तसेच शाहीर ललकारजी चौहान यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला डॉ.श्री.राजे मुधोजी भोसले नागपुर, तसेच पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, शाहीर ललकारजी चौहान, चिरकुट पुंडेकर, भगवान वानखेडे, भगवान लांजेवार, रविंद्र नानवटकर, रविद्र मेश्राम यांचेसह अनेक शाहीर कलाकार या मेळाव्याला उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: