Saturday, December 21, 2024
Homeमनोरंजनशाहरुख खानचा Dunki चित्रपट आता 'या' दिवशी प्रदर्शित होणार...नवीन पोस्टर मध्ये खुलासा...

शाहरुख खानचा Dunki चित्रपट आता ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार…नवीन पोस्टर मध्ये खुलासा…

Dunki Release Date : ‘पठाण’ आणि ‘जवान’नंतर आता शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या चित्रपट ‘डिंकी’च्या रिलीज डेटबाबतचा सस्पेन्स संपला आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली.

हा चित्रपट याच वर्षी २१ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरसोबत नमूद केलेल्या ‘डिंकी’च्या रिलीजच्या तारखेवरून स्पष्टपणे दिसून येते की हा चित्रपट पुढे ढकलण्यात आलेला नसून तो याच वर्षी रिलीज होणार आहे. या पोस्टरमध्ये किंग खान खांद्यावर बॅग घेऊन कुठेतरी जाताना दिसत आहे.

या पोस्टरमध्ये शाहरुख खानने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला असून खांद्यावर आणि हातात बॅग आणि जॅकेट आहे. जर तुम्ही हे पोस्टर नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल की 6 जणांचा ग्रुप तिथून जात आहे आणि किंग खानच्या समोर फक्त धूळ आहे. मात्र, या पोस्टरमध्ये शाहरुखचा चेहरा समोर आलेला नाही. पोस्टरमध्ये किंग खान पाठ फिरवून उभा आहे.

शाहरुख खानच्या ‘डिंकी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सलमान खानच्या ‘टायगर 3’ या चित्रपटासोबतच ‘डिंकी’ चित्रपटाचा टीझर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण यशराज फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: