Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayशाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल...

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल…

न्युज डेस्क – ‘पठाण’ चित्रपटानंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या पुढच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, ‘जवान’ संदर्भात आलेल्या नवीन अपडेटमुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. या चित्रपटाची रिलीज डेट वाढवण्यात आली आहे. आता हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार नाही. मात्र, नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

एका चित्रपट समीक्षकाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. त्याने ‘जवान’चे पोस्टर शेअर करत लिहिले की, ‘जवान’ हा चित्रपट 2 जून 2023 रोजी रिलीज होणार नाही. हा चित्रपट दुसऱ्या तारखेला प्रदर्शित होणार आहे. या माहितीवर शाहरुख खानचे चाहते अत्यंत निराशाजनक कमेंट करत आहेत. तसेच चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाच्या तारखेसाठी सूचना दिल्या आहेत.

या पोस्टवर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कदाचित दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या रिलीजसाठी अधिक चांगले असेल.’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘अरे यार! काय झालं की रिलीज डेट बदलली. एका यूजरने लिहिले, ‘जूनमध्ये नाही तर एप्रिलमध्ये रिलीज.’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘ज्यावेळी हा चित्रपट प्रदर्शित होईल, तो काहीतरी चमत्कार करेल. अॅटली यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानशिवाय साऊथचे स्टार्सही दिसणार आहेत. नयनतारा आणि विजय सेतुपती या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘जवान’ व्यतिरिक्त शाहरुख खान त्याच्या आणखी एका ‘डंकी’ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. सध्या किंग खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, ‘पठाण’ने आज चौथ्या शनिवारी 4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 512.60 कोटी रुपये झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: