Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनशाहरुख खानचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात...रुग्णालयात दाखल...

शाहरुख खानचा शूटिंगदरम्यान मोठा अपघात…रुग्णालयात दाखल…

न्युज डेस्क – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबाबत नुकतीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की शाहरुख खान एका भीषण अपघाताचे बळी ठरले आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याचेही सांगण्यात येत आहे.

शाहरुख खान त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून सध्या तो लॉस एंजेलिसमध्ये शूटिंग करत आहेत. या शूटमध्ये त्याच्यासोबत एवढा मोठा अपघात घडला की शाहरुखला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. त्याच्या शस्त्रक्रियेची बाबही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे.

ETimes च्या वृत्तानुसार, शाहरुख खानसोबत एक एक्शन सीन शूट करत होते. यादरम्यान त्यांच्या नाकाला दुखापत झाली. या अपघातानंतर शाहरुखला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आणि त्याच्या नाकातून रक्तस्त्राव थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

किंग खान आता घरी आला असून तो या अपघातातून सावरत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणी शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

जगभरात सुमारे 1000 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले. यानंतर शाहरुख खान आता त्याचा पुढचा एक्शन सिनेमा ‘जवान’च्या तयारीत आहे.

या चित्रपटात शाहरुखचा आणखी उग्र अवतार पाहायला मिळणार आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर शाहरुखकडे राजकुमार हिराणीचा ‘डंकी’ हा चित्रपटही आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: