Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीतीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत कारवाई, ३ आरोपी अटक...

तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत कारवाई, ३ आरोपी अटक…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असे सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित पांडुरंग हनुमंत यमगर, सुभाष यमगर (दोघे रा. बनपुरी, ता. आटपाडी), किरण बाळासाहेब शेंडगे (रा. शेंडगेवाडी, ता. आटपाडी) या युवकांविरूद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित तिघे युवक हे काही दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते. त्यांनी फिरायला जाऊया असे सांगत सकाळी दहा वाजेच्या सुमारास आटपाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलवून घेतले.

तेथून त्यांना कौठुळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेले आणि त्याठिकाणी त्यांनी या मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला. पीडित मुलींना घेऊन त्यांनी आटपाडी पोलिस ठाणे गाठले. संशयित पांडुरंग यमगर, सुभाष यमगर, किरण शेंडगे यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत. दरम्यान, आटपाडी पोलिसांनी हे प्रकरण तेथून त्यांना कौठुळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: