सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.
शिवसेनेच्या मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून स्वखर्चाने १०० ट्रॅव्हल्स सह इतर चार चाकी गाड्यातून सात ते आठ हजार शिवसैनिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून रवाना होणार असल्याची माहिती सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाक्याच्या जवळ सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणाहून वाजत गाजत दसरा मेळाव्यासाठी निघणार असून ,सांगली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी आनिवाडी टोलनाक्यावर एकत्र जमावे असे आवाहन विभुते यांनी केले आहे.