सांगली – ज्योती मोरे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा देशभरात साजरा केला जात आहे. सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, व महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई शिंदे,सेवा पंधरवडा अध्यक्ष व सरचिटणीस वैशालीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पूर्व मंडल मिरज शहर अध्यक्ष रूपाली देसाई यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी क्रमांक 81 मध्ये वय वर्षे एक ते तीन व चार ते सहा अशा दोन गटात सदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत अनेक बालकांनी सहभाग घेतला होता.
अंगणवाडी सेविका कल्पना खांडेकर मदतनीस माधवी मस्के पर्यवेक्षिका कांचन मेहेत्रे यांचे या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात माजी महापौर सौ संगीताताई खोत व जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुरणे तसेच अध्यक्षा रूपाली देसाई यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना जयश्रीताई कुरणे म्हणाल्या की, पालकांनी आणि समाजाने अंगणवाडी सेविकांना चांगला प्रतिसाद द्यावा.
त्याचबरोबर सदृढ बालक व सुदृढ बालकाच्या माता कशा असाव्यात? याबद्दल माजी महापौर सौ संगीता ताई खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कांचन म्हेत्रे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना खांडेकर यांनी केले तर समारोप व आभार माधवी मस्के यांनी केला. यावेळी महिला मोर्चा पदाधिकारी सुचित्रा बर्वे, रश्मी जाधव, रेखा शेजवळ, पुष्पा खराडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.