सांगली प्रतिनिधी:- ज्योती मोरे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो पदयात्रेचा व त्याला देशातील विविध भागातील सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळं भाजपा सरकारचे धाबे दणाणल्यामुळंच राहूल गांधींवर केस आणि खासदारकी रद्दच्या झालेल्या अन्यायकारक कारवाई विरोधात सर्वसामान्य माणसांमधून लढा उभा करण्यासाठी देशभरात संकल्प सत्याग्रह उभारून आंदोलन उभे करणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले यांनी आज काँग्रेस भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने संकल्प सत्याग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आंदोलन उभं केलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार बैठकांचं आयोजन केले जाऊन आपल्या भावना सर्वसामान्य लोकांसमोर व्यक्त केल्या जाणार असल्याचेही ढोले यांनी म्हटले आहे .