Monday, December 23, 2024
Homeराज्यमूलचेरा तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची वनहक्क दावे निकाली काढून कायम पट्टे द्या...

मूलचेरा तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची वनहक्क दावे निकाली काढून कायम पट्टे द्या…

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची चामोर्शी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी…

चामोर्शी – मूलचेरा तालुक्यातील बंदुकपल्ली व परिसरातील शेतकऱ्यांचे वन हक्क जमीनीचे दावेअनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडे अतिक्रमण पंजी नाही, अतिक्रमण पंजीत अतिक्रमणाची नोंद नाही या क्षुल्लक कारणावरूनअनेक शेतकऱ्यांचे वनहक्क दावे प्रलंबित ठेवले.

वनहक्क कायद्याच्या 2005 चा अतिक्रमण पुरावा ग्राह्य धरून वनजमिनीवर अतिक्रमण करून त्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे वनहक्क दावे निकाली काढून त्यांना न्याय मिळवून द्यावा,या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी शेतकऱ्यांसोबत चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करून त्यांना शेतकऱ्यांच्या बाजूने निवेदन दिले.

माजी आमदार आत्राम हे उपविभागीय अधिकारी तोडसाम यांच्यासोबत चर्चा व निवेदन सादर करतांना मूलचेरा नगर पंचायतचे गटनेत्या व नगरसेविका सुनीताताई कुसनाके,नगरसेवक बंडुजी आलाम,नगरसेवक संतोष चौधरी,संदिप तोरे, देवराव तलांडे,संतोष तोरे,धर्मा आत्राम,अरविंद तोरे,रवी तलांडे,हिरामण दिवटीवार, श्रीराम मडावी,बाजीराव मडावी बुजंगराव मडावी,जुलेख शेख,विनोद कावेरी,सतीश पोरतेट सह आविस व बि.आर.एस चे पदाधिकारी आणि अतिक्रमण धारक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: