Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयशिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप...काय आरोप आहेत? ते...

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप…काय आरोप आहेत? ते जाणून घ्या…

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद भोसले यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर यांच्यासोबत आर्थिक संबंध असून त्यांची चौकशी केली तर त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल. इतकच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. दीपाली यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

दीपाली सय्यद यांच्या या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गजांना माहिती आहे. असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.आज त्यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यात हे मोठे गंभीर आरोप केले आहेत. या अगोदरही त्यांनी पत्रकार परिषदेत असे आरोप केले होते. सर्व पुरावे माझ्याकडे असून मला संरक्षण द्या मी राज्य शासन आणि पोलिसांना पुरावे देऊ शकतो, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.

भाऊसाहेब शिंदे यांचे नेमके आरोप काय?

सिने अभिनेत्री दिपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असून पाकिस्तानचे नागरिकत्व दिपाली सय्यद यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानामध्ये एक बँक खाते असल्याचा खळबळजनक दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरित्व दिले असल्याचा पुरावा भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केलाय.

दिपाली सय्यद यांच्याबरोबर रामदास आठवले आणि नितीन गडकरी यांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोप करण्यात आलाय.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांनी म्हटलंय.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: