रामटेक – राजू कापसे
घनकचरा व्यवस्थापन नियम नुसार कचरा निर्मित करणाऱ्या नागरिकांनी ओला ,सुका, घातक असा वर्गीकृत कचरा देणे अपेक्षीत असुन तसे न केल्यास व या नियमाचे उल्लंघन केल्यास येत्या एक ऑक्टोबर पासून संबंधित व्यक्तीवर नगरपरिषद प्रशासनातर्फे दंडाची कारवाई केल्या जाणार असुन तो कचरा स्विकारण्यात येणार नसल्याची माहिती नगरपरिषद रामटेकचे मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली.
तरी सर्व नागरिकांनी ओला, सुका व घातक कचऱ्याची वेगवेगळ्या स्वरूपात साठवण करून तो घंटागाडी चालकाला देण्याचे आवाहनही राऊत यांनी केलेले आहे. मिश्रित कचरा दिल्यास व त्याचे विलगीकरण न केल्यास त्याचे घातक परिणाम होत असल्याचे मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी माहिती देतांना सांगितले आहे.
त्यात घनकचरा व्यवस्थापन सोयीचे होत नाही. कंपोस्टिंग करण्याकरिता व्यवस्थित रित्या ओला आणि सुका कचरा विलगिकृत न झाल्याने कंपोस्टिंग व्यवस्थित होत नाही. ओल्या कचऱ्यामध्ये टाकाऊ बॅटरी गेल्याने त्याच्यामध्ये हेवी मेटल साठले जातात व त्या कारण कंपोस्टिंगची गुणवत्ता खालावली जाते.
अशा प्रकारचे कंपोस्ट शेतात वापरल्याने शेताचे जमिनीचे कस निघून जातात व जमीन नापीक बनायला सुरुवात होते. ओला व सुका कचरा मिक्स असल्याकारणानें घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर काम करणारे कर्मचाऱ्यांना ते स्वतः वेगवेगळे करावे लागते व त्या कारण त्यांना वेगवेगळ्या आरोग्य विषयी समस्यांना तोंड द्यावे लागते.
मिश्रित कचऱ्यामध्ये घरगुती घातक कचरा मिक्स असल्याकारणानें , त्यामुळे हगवण, हीप्याटायटीस, टिटॅनस, स्वसणाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. वेळेत कचरा वेगवेगळा न केल्याने त्याचे ढिगारे तयार होऊन ते व्यवस्थापन करण्यासाठी अवघड होते, यामधे मनुष्यबळ, आर्थिक आणि वेळ वाया जातो.
टाकाऊ औषध मिश्रित असल्याकारणाने बायोलोजिकल नाईलाज बॅक्टेरिया (जिवाणू), विषाणू(व्हायरस) यांचे उत्पन्न होते. करिता नगर परिषद प्रशासनाला विलगिकृत कचरा देऊन स्वतःच्या व इतरांच्या जीवाला होणाऱ्या दुष्परिणामांना आळा घालण्यास सहकार्य करण्याचे आवाहण मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी नागरिकांना केलेले आहे.