Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsवर्धा | दोन तरुणांनी तिला घराबाहेर बोलावले...घराबाहेर येताच दोघांनी गळ्यावर चाकूचे वार...

वर्धा | दोन तरुणांनी तिला घराबाहेर बोलावले…घराबाहेर येताच दोघांनी गळ्यावर चाकूचे वार केले…दहेगाव गोसावी येथील खळबळजनक घटना…

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे 23 वर्षीय युवतीच्या घरातून तिला बाहेर बोलावून हत्या करण्यात आली आहेय. या थरारक घटनेने दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याचे कारण अद्याप समोर आले नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यामध्ये आहे.

वर्ध्याच्या नालवाडी येथील दोन तरुण दहेगाव गोसावी येथे पोहचले सोबत असलेल्या दोन मुलींना घराच्या गेटजवळून युवतीला हाक द्यायला लावलीय. रात्रीला युवती घराबाहेर अंगणात येताच मागावून आलेल्या युवकांनी चाकूने गळ्यावर वार केलेय. जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले,पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहेय.

अंकिता सतीश बाईलबोडे असे मृत्यू झालेल्या 23 वर्षीय युवतीचे नाव आहेय. चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करीत पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दहेगाव गोसावी येथे या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे. दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले होते. या थरारक घटनेमुळे गावकार्यांमध्ये चांगलाच रोष आहेय. यापूर्वी वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट येथे प्राध्यापिका जळीत प्रकरण घडले होते, राज्यभर खळबळ माजली होती. या घटनेमुळे देखील आता महिला सुरक्षेच्या बाबतीत प्रश्न निर्माण होत खळबळ निर्माण झाली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: