Sunday, September 8, 2024
spot_img
Homeमनोरंजनज्येष्ठ नाटककार प्र.ल. मयेकर यांना अभिवाचन आदरांजली...

ज्येष्ठ नाटककार प्र.ल. मयेकर यांना अभिवाचन आदरांजली…

मुंबई – गणेश तळेकर

बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या वतीने प्रतिभावान ज्येष्ठ नाटककार स्वर्गीय प्र.ल. मयेकर त्यांच्या ७८ व्या जयंती निमित्त अभिवादनपर “एक संध्याकाळ आठवणींची” हा कार्यक्रम दि. ०७ एप्रिल २०२४ रोजी, रमेश रणदिवे कलादालन (मिनी थिएटर) आणिक आगार येथे आयोजित करण्यात आला होता.

प्र.लं.च्या कार्यकाळात बेस्ट’ने त्यांची “तक्षकयाग”, “अंदमान”, “काळोखाच्या सावल्या”, “रेवती देशपांडे”, “दंगल में मंगल”, “कमळीचं काय झालं”, “अनंत अवशिष्ट” अशी अनेक नाटके सादर केली होती. प्र.लं.च्या लेखन साहित्याच्या जोरावरच मंडळाला नाट्य क्षेत्रात महत्वाचं स्थान मिळवता आलं, बेस्टच्या नावाचा दबदबा निर्माण करता आला,

प्र.लं.च्या हाताखाली तयार झालेले बेस्टचे कलाकार अविनाश नारकर, अरुण नलावडे, शरद पोंक्षे, शीतल शुक्ल, संजय बेलोसे, मेघा मटकर, माधवी जुवेकर इत्यादी मंडळी पुढे व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावली. अश्या ह्या थोर नाटकाराला अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, ज्येष्ठ लेखक आभास आनंद,

ज्येष्ठ नेपथ्यकार प्रकाश मयेकर आणि नाटय प्रशिक्षक श्रीनिवास नार्वेकर यांच्या सोबत बेस्ट मधील सेवानिवृत्त ज्येष्ठ कलाकार सुबोध महाले, शाहीर मधुकर खामकर, अरुण शेलार, माधुरी शेट्टी, उदय दरेकर, नंदकुमार सावंत, गजानन चव्हाण, राज जैतपाल, रामदास विश्वासराव, चारुदत्त वैद्य, पांडुरंग दाभोळकर, संजय चौधरी, विजय बोरकर यांनी प्रलं’च्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी बेस्ट मधील अरुण माने, गणेश मिंडे, संविद नांदलस्कर, रमण चव्हाण, सुभाष लोखंडे, माधव साने, प्रवीण नाईक, माधवी जुवेकर आणि मानद सचिव (नाटय) प्रमोद सुर्वे ह्या आत्ताच्या फळीने प्र.लं.च्या काही गाजलेल्या नाटकांचे प्रवेश सादर करून त्यांना आदरांजली वाहिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता पुरव यांनी केले, तर या कार्यक्रमाचे आयोजन सरचिटणीस कला विजय सूर्यवंशी यांनी केले होते,

कार्यक्रमाला बेस्ट उपक्रमाचे मुख्य कर्मचारीय व्यवस्थापक व मंडळाचे सभापती (कला) डॉ. राजेंद्र पाटसुते हे आवर्जून उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रियाझ पठाण, दिलीप लिगम, दीपक सावंत, रवींद्र गमरे, श्याम शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: