Sunday, December 22, 2024
Homeराज्यतिर्थक्षेत्र लाखपुरीत ज्येष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख यांचा सत्कार संपन्न...

तिर्थक्षेत्र लाखपुरीत ज्येष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख यांचा सत्कार संपन्न…

गाडगेबाबा मिशन मुंबई चे संचालक, दर्यापूर प्रेस क्लब चे ज्येष्ठ पदाधिकारी, अनाथ आश्रम दर्यापूर चे संचालक व विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे माननीय गजाननराव देशमुख दर्यापूर यांच्या वयाच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त दर्यापूर येथे मिळालेल्या जीवन गौरव पुरस्काराचे औचित्य साधुन तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी ता. मूर्तिजापूर जि.अकोला येथे श्री लक्षेक्ष्वर संस्थानला सतत मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पत्रकार मा.गजाननराव देशमुख यांचा कावड उत्सव आढावा बैठक दरम्यान संस्थान तर्फे मा.आमदार हरिष पिंपळे व मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार विलास नसले,जयप्रकाश रावत,दिपक जोशी,दिपक अग्रवाल,

संजय उमक,अकोला येथील जयेश जग्गड,जिवन सोनटक्के,संजय चक्रनारायण, योगेश सिरसाठ,प्रकाश श्रीवास,सुमित सोनोने,गजानन गवई,अतुल नवघरे,रोहीत सोळंके,संतोष माने,धनराज सपकाळ,मच्छिद्र भटकर सह आदी पत्रकार बांधव यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भगवान श्री लक्षेश्वराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे,मुर्तिजापुर ग्रामिणचे ठाणेदार सुरेंद्र राऊत,दर्यापुर ठाणेदार संतोष टाले ,नगरपरिषद मुख्यअधिकारी सुप्रिया टवलारे,उमाळे साहेब,नवलकार साहेब, उपकार्यकारी अभियंता खाडे साहेब , कनिष्ठ अभियंता गावडे साहेब, कनिष्ठ अभियंता पंकज जोगी, जवंजाळ, मॅडम, नायब तहसिलदार उमेश बनसोड, मंडळ अधिकारी राजु जाधव, तलाठी संदीप बोळे आदी उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: