Saturday, December 21, 2024
HomeBreaking Newsभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल...

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल…

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली असून, त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लालकृष्ण अडवाणी यांना नियमित तपासणीसाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाही ऑगस्ट महिन्यात अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जुलै महिन्यातही देशाचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एम्समध्ये डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. त्यावेळी अडवाणींना युरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते.

यावर्षी त्यांना देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची, पाकिस्तान येथे झाला. 8 नोव्हेंबर रोजी अडवाणींनी त्यांचा 98 वा वाढदिवस साजरा केला. अडवाणी 2002 ते 2004 पर्यंत भारताचे उपपंतप्रधान आणि 1999 ते 2004 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री होते. लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मार्चमध्ये अडवाणींना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन हा सन्मान दिला. या सन्मान सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि अडवाणींचे कुटुंबीय उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: