रामटेक – राजू कापसे
कविकुलगुरु इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायंस (किट्स) रामटेक मध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधे उच्च तांत्रिक शिक्षणाची भूमिका व अभ्यासक्रमात सुधारणा या विषयी 28 जुलाईला चर्चासत्राचे आयोजन केले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे होते.
प्रमुख व्यक्ते म्हणून डीन डॉ. प्रा. विलास महात्मे होते. या वेळी प्रामुख्याने डीन डॉ. पंकज आस्टनकर, कुलसचिव प्रा. पराग पोकळे, विविध विभागाचे विभाग प्रमुख, इतर डीन, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कंम्पुटर विभागाचे प्रमुख व प्रमुख व्यक्ते डॉ. प्रा. विलास महात्मे यांनी प्रेसेंटेशन द्वारे नविन शैक्षणिक धोरणाविषयी माहीती दिली व म्हणाले की नविन शैक्षणिक धोरणामुळे तांत्रिक उच्च शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल घडणार आहे. विद्यार्थ्याच्या अंगभूत गुणांना वाव मिळणार असून त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेता येणार आहे. अभियांत्रीकीचा विविध शाखा मध्ये अभ्यास करता येईल.
प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले नविन शिक्षण पद्धतीमध्ये बहुपर्याय व लवचिकता आहे. मातृभाषा, प्रादेशीक भाषा व भारतीय ज्ञान परंपरेला महत्व दिले आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वनिर्माणाला नवी दिशा देणारे शिक्षण आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डीन. डॉ. प्रा. पंकज आष्टणकर यांनी केले.