रामटेक – राजु कापसे
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त ४ जानेवारीला प्राचार्य सोनीराम धोटे यांचे मार्गदर्शनाखाली ‘वन आणि वनउपज’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.
याप्रसंगी बन्यान ट्री फाऊंडेशनचे सहायक संचालक संजय करकरे आणि संपदा करकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चर्चासत्रात इयत्ता आठवीच्या ६६ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शाळेचे पर्यावरण शिक्षक साक्षोधन कडबे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक दिलीप पवार, प्रशांत पोकळे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, अमित मेश्राम व समस्त शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोरेश्वर दुनेदार, राशिद शेख यांनी सहकार्य केले.