रामटेक – राजु कापसे
रामटेक :- जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. अर्चना जयप्रकाश दुबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ द्वितीय ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन चे रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी राजकमल बोटिंग सेंटर, रामटेक स्थित खिंडसी तलावामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे.
ओपन वॉटर स्विमिंग चा प्रसार प्रचार करून जलतरणपटूंना मॅरेथॉन स्विमिंग मध्ये सहभागाची संधी उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. खिंडसी तलावामध्ये प्रथमच होणाऱ्या या भव्य स्पर्धेमध्ये एकूण पाच वयोगटामधून विविध अंतराच्या स्पर्धा होणार आहेत.
यामध्ये 200 मीटर, 400 मीटर, 1 किलोमीटर व 5 किलोमीटर अंतराच्या स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये 10 ते 13, 13 ते 16 ,16 ते 35, 35 ते 50 50 ते51 या पाच वयोगटातील महिला व पुरुषांसाठी स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना गौरव प्रमाणपत्र , मेडल व टी-शर्ट देऊन त्यांच्या गौरव करण्यात येणार आहे. सर्व सहभागींना देखील फिनिशर्स मेडल देण्यात येणार आहे.
आता नव्याने ऑलंपिक स्पर्धेमध्ये ओपन वॉटर मॅरेथॉन व स्विमिंग चा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे साहसी जलतरणाला या स्पर्धेतून निश्चितच उदयोन्मुख जलतरणपटूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचे स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी सांगितले. राजकमल बोटिंग सेंटर, खिंडसी येथे येथून सकाळी आठ वाजता या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वीते करिता नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, डॉल्फिन स्विमिंग क्लब, राजकमल बोटिंग सेंटर, चेरी फॉर्म, सीएसी ऑलराऊंडर- एडवेंचर , सृष्टी सौंदर्य बहुउद्देशिय संस्था रामटेक , वॉटर वर्ल्ड ,आपदा मित्र , उज्वल स्पोर्ट्स व स्थानिक प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी डॉ. संभाजी भोसले , जयंत दुबळे, महेंद्र कपूर, सुशील दुरगकर व अमोल रायपूरकर हे सांभाळणार आहे.