हेमंत जाधव
विना विलंब नुकसानिचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरिव मदत देण्याची स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची मागणी…
बुलढाणा जिल्ह्यामधे दोन दिवसापासुन ठिक ठिकाणी प्रचंड प्रमाणात हवा गारपिट सह चक्रिवादळ झाले आहे. यामधे शेतकऱ्यांचे रब्बिचे गहु हरभरा,कांदा,ज्वारी भाजिपाले सह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकाऱ्यांन सह स्वाभिमानी चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर थेट संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल शेत शिवारात जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. विना विलंब २४ तासाच्या आत नुकसानिचे पंचनामे चालु करून शासनाने शेतकऱ्यांना भरिव मदत द्यावी. अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे.