Monday, November 18, 2024
HomeUncategorizedस्व. डॉ. लोकचंद शरणांगत यांच्या पुण्यतिथी निमीत्त्यानेभव्य निःशुल्क रोगनिदान शिबीर...

स्व. डॉ. लोकचंद शरणांगत यांच्या पुण्यतिथी निमीत्त्यानेभव्य निःशुल्क रोगनिदान शिबीर…

रामटेक – राजु कापसे

रामटेक येथील हीरण आॅप्टीकल, रामाळेश्वर वार्ड येथे दिनांक १० सप्टेंबर २०२३ ला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत. तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रोगनिदान, चाचण्या, उपचार, मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल. शिबीरामध्ये हृदयासंबंधी तपासणी, नेत्र रोग तपासणी, मोतियाबिंदू तपासणी, अस्थिरोग तपासणी, लहान मुलांच्या आजारांची संपूर्ण तपासणी, स्त्री रोग तपासणी, ब्लड प्रेशर,

ब्लड शुगर, ई.सी.जी. (मोफत), चर्मरोग तपासणी, एन्जियोप्लास्टी, बायपासचे पेशन्ट अॅलोपॅथीक होमिओपॅथीक समुपदेशन
शिबीर यशस्वी करण्यासाठी तज्ञ डॉक्टर येणार डॉ. खुशाल लोकचंद शरणांगत हृदयरोग तज्ञ MBBS MD DNB (Cardiology),डॉ. हिती आशिष शरणांगत जनरल फिजीशियन तज्ञ BHMS, CGO,डॉ. निकेत ठोंबरे (अस्थिरोग तज्ञ) MBBS Orthopaedic Surgeon,डॉ. निलेश गद्देवार नेत्ररोग तज्ञ MBBS MS (Opthamology),

डॉ. पुजा मनवर रामटेके चर्मरोग तज्ञ MBBS MD,डॉ. पंकज शरणांगत (आयुर्वेद सल्लागार) BAMS Ayurvedic,डॉ. कश्मीरा खुशाल शरणांगत स्त्रीरोग तज्ञ MBBS DGO,डॉ. निकुंज शरणांगत जनरल सर्जन, प्रोक्टोलॉजिस्ट सल्लागार BAMS MS असे शिबीराचे आयोजक आशीष शरणांगत, सुर्यकांता शरणांगत, भोजू कटरे यांनी या शिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहण केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: