Sunday, December 22, 2024
Homeक्रिकेटअमरावतीच्या जितेश शर्माची टीम इंडिया मध्ये निवड...BCCI ने ट्वीट करून दिली माहिती...

अमरावतीच्या जितेश शर्माची टीम इंडिया मध्ये निवड…BCCI ने ट्वीट करून दिली माहिती…

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले आव्हान सादर करणार आहे. तर यावेळी विदर्भाच्या टीम कडून खेळणारा अमरावतीच्या जितेश शर्माला टीम इंडिया मध्ये विकेट कीपर म्हणून संधी देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत टी-20 स्वरूपात होणार आहे.

कोण आहे जितेश शर्मा?

29 वर्षीय यष्टीरक्षक सोबत धडाकेबाज फलंदाज म्हणून ख्याती असलेला जितेश शर्मा हा अमरावती शहरातील आहे. तो विदर्भासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. लिस्ट ए सामन्यांमध्येही तो विदर्भाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 553 धावा केल्या आहेत तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 1350 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून 1787 धावा केल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये तो पंजाब किंग्जचा भाग होता. गेल्या मोसमात तो पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान त्याने 12 सामन्यांच्या 10 डावात 234 धावा केल्या. आयपीएल 2022 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 44 धावा होती.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. तसेच या खेळाडूंच्या निवडीवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ते विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाच्या नियोजनात नाहीत.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष संघ: ऋतुराज गायकवाड (C), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी , शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक).

स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेट
आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा भाग घेण्याची ही तिसरी वेळ असेल. यापूर्वी 2010 आणि 2014 मध्ये, भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष किंवा महिला संघ पाठवले नाहीत. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये, बांगलादेश आणि श्रीलंकेने प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले आहे आणि महिलांमध्ये, पाकिस्तानने दोन्ही वेळा जिंकले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: