पातूर – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे जाहीर झालेल्या निकालामध्ये दिग्रस खु.ता. पातुर जि. अकोला येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी कु. देवीभारती उल्हास महल्ले हिने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून उद्योग निरीक्षक हे पद मिळवून दिग्रस गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ग्रामीण भागात राहत असलेले वडील व्यवसायाने शेतकरी होते.त्यांची इच्छा नेहमीच आपल्या मुलीला उच्च पदावर कार्यरत होताना पहायचे होते.परंतु उल्हास महल्ले यांचे अकाली निधन झाल्याने त्यांना हे मुलीचं यश पाहता आले नाही.
परंतु मुलगी देविभारती हिने जिद्द आणि कठोर मेहनतीने यश संपादन करून वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.वडिल गेल्यानंतर जावई असलेले नितीन फाटकर यांनी तिला धीर देत सर्व शिक्षणाची जबाबदारी घेऊन परीक्षा देण्यासाठी खूप साहाय्य केले आणि त्या प्रयत्नाने देविभारती हिने उद्योग निरीक्षक या पद मिळविले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत दिग्रस खुर्द येथील पहिली मुलगी उत्तीर्ण झाल्यामुळे देविभारती चे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा दिग्रस (खु) येथे तर माध्यमिक शिक्षण जागेश्वर विद्यालय वाडेगाव आणि पदवीचे शिक्षण खंडेलवाल कॉलेज अकोला येथे झाले, ती तिच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील आणि जावई सैनिक नितीन फाटकर तसेच शिक्षक वृंद यांना देते.