पातूर – निशांत गवई
अकोला जिल्ह्यातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रति अधिवेशनासाठी नथमल गोयनका विधि महाविद्यालयाचे एल.एल.बी.प्रथम वर्ष चे विद्यार्थी व डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालय पातूर चे माजी विद्यार्थी आकाश गुलाबराव हिवराळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या यिन अधिवेशनासाठी निवड झाली आहे.
25 ते 27 एप्रिल या कालावधीत दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये हे अधिवेशन होणार आहे.देशाच्या राजकारणातील अनेक महत्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.आकाश हिवराळे यांची केंद्रीय शिक्षण प्रणाली या समितीवर निवड झाली असून देशातील शिक्षण व्यवस्थेवर चर्चा या यिन प्रति केंद्रीय अधिवेशनात करणार आहेत.आकाश हिवराळे यांचे शिक्षण क्षेत्रातील काम बघता त्यांची निवड झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.सुरेंद्र अवचार हे त्यांच्या सोबत असणार आहेत.देशातील शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा दर्जेदार शिक्षण प्रणाली व्हावी यासाठी त्याचा भर असणार आहे.