Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingसीमा हैदरने माधुरीच्या गाण्यावर असा केला डान्स...Video Viral

सीमा हैदरने माधुरीच्या गाण्यावर असा केला डान्स…Video Viral

Video Viral – सध्या देशात गाजत असलेल प्रेम प्रकरण म्हणजे सीमा-सचिनच, गदर 2 रिलीज होण्यापूर्वीच लोकांना पाकिस्तानी महिला आणि हिंदू मुलाची खरी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. नोएडाच्या सचिन मीनाची पाकिस्तानी मैत्रीण सीमा हैदर हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या पाकिस्तानी महिलेबाबत गुप्तचर यंत्रणांनी एसएसबी (सशस्त्र सीमा बल) आणि यूपी पोलिसांकडून अहवाल मागवला आहे.

विशेष म्हणजे सीमा नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि ती अनेक दिवसांपासून तिचा प्रियकर सचिन मीनासोबत नोएडा येथे राहत होती. दरम्यान, सीमा हैदरचा एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

सीमा हैदरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती माधुरी दीक्षितच्या ‘गले में लाल टाई घर में एक चारपाई’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये सीमाचा डान्स आणि तिचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. सीमाचा डान्स पाहून तिला डान्सची खूप आवड असल्याचं समजतं. इतकेच नाही तर याआधीही सीमाचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

सीमा हैदरच्या या डान्स व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने ‘ती एक चांगली डान्सरही आहे’ असे लिहिले आहे. दुसर्‍या युजरने खिल्ली उडवली की, ‘हा डान्स पाहून मला असं का वाटलं की मीही सीमाच्या प्रेमात पडत आहे’. तर दुसरा यूजर लिहितो, ‘ये तो भाई रवीना टंडन को भी फेल करेगी’. अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: