आज राज्यातील शिवसेनेतील बंडखोरी आणि शिंदे सरकार स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या संपूर्ण घटनेबाबत विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपालांच्या भूमिकेवर नक्कीच प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपाल कायद्यानुसार वागले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जाऊन राजीनामा दिला नसता, तर आज परिस्थिती वेगळी असती, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीत वार केले. ज्यांना पक्षाने सर्वस्व दिले, त्यांनी विश्वासघात केला, असे ते म्हणाले. गद्दारांना सोबत घेऊन सरकार कसे चालवू शकतो. अशा परिस्थितीत नैतिकतेच्या आधारे मी राजीनामा दिला असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
यावर फडवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत फडणवीस म्हणाले की, हा लोकशाहीचा आणि लोकशाही प्रक्रियेचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आम्ही समाधानी आहोत…महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, वृत्तसंस्था ANI ने हे ट्वीट केले. या ट्वीटला सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी रिट्वीट करीत संताप व्यक्त केला…
‘निर्लज्ज मित्रांनो! राज्यपालांनी उद्धव यांना विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगून बेकायदेशीर कृत्य केल्याचे सांगूनही सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हटवले नाही म्हणून हसू आले; आणि व्हिपची नियुक्तीही बेकायदेशीर होती.
निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल यात शंका नाही’…