Tuesday, July 16, 2024
spot_img
Homeराज्यमानसिक स्वास्थ बिघडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेचे पोलिसांपुढे आव्हान...

मानसिक स्वास्थ बिघडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेचे पोलिसांपुढे आव्हान…

दहीहंडा परिसरात आठवड्याभरात दोन घटना उघड…

महीलांप्रती आदर राखण्याचे ठाणेदारांचे आवाहन

अकोला : भारतीय संस्कृतीत महिलेचा आदर  राखण्याची शिकवण दिली असली तरी अनेकवेळा महिलांना अत्याचाराचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या महिला यांची देखभाल म्हणजे या एक प्रकारे कुटुंबासाठी आवाहन असते. मात्र अशा महिला घर सोडून गेल्यास  अत्याचारांना बळी पडू नये याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस निभावत असतात. नुकताच दहीहंडा परिसरात अशाच दोन घटना उघडकीस आल्या असून या  दोन्ही महिलांना दहीहंडा पोलिसांनी सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. “कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशा घटना म्हणजे पोलिसांसाठी आव्हान असून नागरिकांनी सहकार्य करावे”, असे आवाहन दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले.

नुकताच अकोट तालुक्यातील आंबोडा येथील एक मानसिक स्वास्थ बिघडलेली महिला रस्त्याने सैरावैरा फिरत होती. तिच्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती. मात्र दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची तत्काळ दखल घेत या महिलेला तिच्या घरी सुखरूप पोहचविले. याच पाठोपाठ वरुड जऊळका गावानजीक डिनोडा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ मध्यरात्री एक महिला दहीहंडा पोलीस ठाण्यातील रात्र पाळीवर गस्तीवर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद साळवे , बीट अंमलदार गणेश अवचार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश देशमुख, पो.ना.काॅ.‌प्रविण पेठे यांच्या नजरेस पडली.

सदर कर्मचाऱ्यांनी याबाबत ठाणेदार ठाकरे यांना माहिती दिली. ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली त्या महिलेला रात्री 1 वाजता पासून त्या महिलेला संरक्षण देतसकाळी ४ च्या सुमारास तिला विश्वासात घेत दामिनी पथकाच्या सहकार्याने तिचे मूळ गावी लोतखेड कुटुंबियांच्या स्वाधीन केले. या दोन घटना साध्या दिसत असल्या तरी महिलांच्या दृष्टिकोनातून संवेदनशील होत्या. रात्री अपरात्री एकट्या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यातून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता असते. मात्र दहीहंडा पोलिसांनी दाखविलेली संवेदनशीलता खरोखर वाखाणण्याजोगी असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहे. तसेच “सामान्य नागरिकांनीही महिलांप्रती आदर राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: