Salman Khan : सुपरस्टार सलमान खान आणि बिश्नोई टोळीशी अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. बिश्नोई टोळीकडून अभिनेत्याला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एवढेच नाही तर भाईजानला मारण्याची योजनाही अनेकवेळा रचण्यात आली आहे. सलमानला या धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. सलमान खानला 2022 मध्ये आलेल्या धमकीनंतर वाय-प्लस सुरक्षा देण्यात आली होती. त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये पुढील धमकीनंतरही अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. पण आता बातमी आली आहे की, सलमानच्या कुटुंबालाही विशेष सुरक्षा देण्यात येत आहे.
आयुष शर्माची सुरक्षा वाढवली
आता मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या कुटुंबाला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आता सलमान खानचा जावाई आयुष शर्माच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आता आयुष शर्मा कोणत्याही कार्यक्रमाला गेला तर त्याच्या आजूबाजूला पोलीस कर्मचारी तैनात दिसतील. याशिवाय आयुष शर्मा कोणत्याही प्रमोशनसाठी बाहेर गेला तर त्याला सलमान खानच्या बुलेटप्रूफ कारमधून प्रवास करण्याची सूचना देण्यात आली आहे. याचाच अर्थ आता अर्पिता खानच्या पतीच्या सुरक्षेसाठी पोलीसही सतर्क झाले आहेत. सततच्या धमक्यांमुळे संपूर्ण सुपरस्टार कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे.
सलमान खानच्या बुलेटप्रूफ कारमधून जावाई आयुष शर्मा प्रवास करणार!
मात्र, एकीकडे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवत आहेत. दुसरीकडे, अभिनेता स्वत: बरीच खबरदारी घेताना दिसत आहे. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सलमान खानने स्वत:साठी बुलेटप्रूफ वाहनाची व्यवस्था केली आहे. इतकेच नाही तर दबंग खानला वैयक्तिक शस्त्रे ठेवण्याची परवानगीही मिळाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अभिनेता आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत पोलिसांचे कोणतेही दुर्लक्ष नाही. बिश्नोई गँग अनेक वर्षांपासून सलमान खानच्या जीवावर बेतली आहे.
लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर सलमान खान आणि त्याचे कुटुंब
कधी पत्र पाठवून तर कधी मीडियासमोर उघड इशारे देऊन, लॉरेन्स बिश्नोई सलमानला धमकावण्याचा प्रयत्न करत असतो. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येनंतर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच ‘टायगर 3’ मध्ये दिसला होता. आता तो ‘द बुल’मध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आयुष शर्मा त्याच्या जबरदस्त अभिनयासाठी देखील ओळखला जातो. आता तो ‘रुस्लान’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र जाहिरात करताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.
Amidst heightened security concerns following death threats to Salman Khan, his brother-in-law Aayush Sharma receives police protection as he promotes his upcoming film "Ruslaan." The Mumbai Police have extended security measures to Salman's family, ensuring their safety amidst… pic.twitter.com/mfmhuGD6lV
— The Filmy Charcha (@thefilmycharcha) February 19, 2024