अमरावती – दुर्वास रोकडे
शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून दि. 4 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर) नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.