केन्द्र सरकारने काल कांद्याची निर्यात उठविली आहे असे सर्व माध्यमातून प्रसारित करण्यात आले व डॉ. भारती पवार केंद्रीय मंत्री यांनी सुद्धा माध्यमात बोलुन आम्ही केल्याचा गव्ह गव्हा केला व आज सकाळी शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की अद्ापपर्यंत केन्द्र सरकार कडून नोटिफिकेशन निघाले नाहीं म्हणून शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपसात चर्चा सुरू झाली व ही बातमी दिल्ली पर्यंत पोहचली की शेतकरयांना ही निवडणुकीच्या तोंडावर शेतकरयांना खूष करण्यासाठी केली व कांद्याचे थोडे फार भाव वाढले याचा फायदा होईल अश्या तऱ्हेचे खोटे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा जखमेवर मीठ चोळन्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
परंतु शेतकऱ्यांचा विश्वास ह्या सरकार वरून उडाला आहे. अकोला जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव ह्या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहे.सुरेशभाऊ जोगळे.जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अकोला.