Sunday, December 22, 2024
Homeराज्यसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे याचं निधन...

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे याचं निधन…

मुंबई – राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे यांच काल संध्याकाळी आकस्मिक निधनाच्या बातमीने राज्यात शोककळा पसरली आहे. प्रशांत नवघरे यांचा मृत्यू नेमका कश्याने झाला याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावरच उघड होईल. त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद रमाबाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या काळाघोडा परिसरातील तृष्णा हॉटेलमध्ये प्रशांत नवघरे हे आपल्या मित्रांसोबत जेवायला गेले होते .जेवत असताना प्रशांत नवघरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यांच्या सहकार्यानी नवघरे यांना ताबडतोब बॉम्बे हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी नेलं पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

sonu sharma in amravati

या घटनेची माहिती नातेवाईकांना व माता रमाबाई मार्ग पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून घेतली. याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. त्यानंतर पोलीस याबाबत चौकशी करू अशी माहिती माता रमाबाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: