Monday, December 23, 2024
Homeराज्यगोंडवाना विद्यापीठ संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांची अधिसभेवर नियुक्ती...

गोंडवाना विद्यापीठ संघटनेचे सचिव सतिश पडोळे यांची अधिसभेवर नियुक्ती…

गोंडवाना विद्यापीठ कर्माचारी संघटनेचे सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतिश पडोळे यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या अधिसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहे. सतिश पडोळे हे गोंडवाना विद्यापीठाच्या आस्थापनेवर ऑगस्ट 2012 पासून कार्यरत असून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक केलेली आहे.

विद्यापीठातील आपल्या सहकारी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती सुधारावी व इतरत्र बँकांमध्ये कर्ज मागानिकरिता भटकण्याची वेळ येऊ नये या विचाराने कर्मचाऱ्यांना प्रेरित करून स्वतःचे भागभांडवल उभे केले व कर्मचारी यांनी स्वयं अर्थसाहाय्यित करण्याकरिता गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.

तसेच सन 2017 पासून संघटनेचे सचिव म्हणून त्यांनी प्रशासकीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आग्रही व आक्रमक भूमिका घेत प्रशासनास कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या निकाली काढण्यास त्यांनी भाग पाडले आहे.

कर्मचाऱ्यांच्या समस्यांची जाणिव असलेल्या संघटनेच्या सचिवांची मा. कुलगुरू यांनी अधिसभा सदस्य म्हणून नियुक्ती केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अधिसभा सदस्य सतिश पडोळे यांनी नियुक्तीबाबत मा. कुलगुरू. मा. प्र- कुलगुरू तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: