Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनखोडगाव येथे रंगला दुय्यम खडा तमाशा, लोककलेतून सामाजिक प्रबोधन...

खोडगाव येथे रंगला दुय्यम खडा तमाशा, लोककलेतून सामाजिक प्रबोधन…

रामटेक – राजू कापसे

दीपावलीच्या पावन पर्वावर खोडगाव येथे नुकतेच आयोजित दुय्यम खडा तमाशाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली तमाशात एवढी रंगत आली की काही वेळातच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. शाहीर संजय विलास तुरा प्रकाश मंडळ मु तितुर विरुद्ध शाहीर रविबाबू हजारे गुरु सुभान पार्टी मु देवडी यांच्यात जोरदार मुकाबला झाला कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमामध्ये सामाजिक प्रबोधन करण्यात आले, कार्यक्रमाला रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशीष बाबू जयस्वाल ,पंचायत समिती सदस्य अस्मिताताई बिरनवlर ,शाहीर राजेंद्र बावनकुळे कामठी, उपसरपंच शिशुपाल अतकरे वरील पाहुण्यांनी खोडगाव वासियांना दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमा च्या शुभेच्छा देवून मार्गदर्शन केले.महामंत्री भाजप युवा मोर्चा नागपूर जिल्हा राहुल किरपान, प्रहार चे संयोजक रमेश कारामोरे, माजी सरपंच सुनील डोकरीमारे, अध्यक्ष संजीवनी ग्रा. बि.शेती संस्थेचे अशोक नाटकर ,

रवी मोहनकर , प्यारेलाल गायकवाड, विलास नागोसे ,मोरेश्वर घरजाळे, काशिनाथ नाटकर , कचरू पिसे, शाहीर भगवान लांजेवार ,शाहीर अरुण मेश्राम, शाहीर चिरकुट पुंडेकर ,शाहीर रवींद्र मेश्राम ,रमेश रामटेके यांनी भेट दिली .यावेळी सरपंच अजय सहारे, उपसरपंच शिशुपाल अतकरे, नरेंद्र बावनकुळे ग्रामपंचायत सदस्य ,सुभाष नागोसे ,इंद्रपाल अतकरे माजी ग्रामपंचायत सदस्य ,भीमराव गायकवाड ,पुनाराम सोनवणे, कृष्णा सोनवणे ,राजकुमार चौधरी, देवचंद आतकरे ,रामदास पटले ,शिवशंकर गायकवाड व गावकऱ्यांनी पाहुण्यांच्या सत्कार करून आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: