प्रवाशांना भुदंड सहन करावा लागणार…
मुंबई – प्रफुल्ल शेवाळे
दिवाळी सणाच्या धर्तीवर एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ केली आहे.. सदर भाडे वाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून२७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच,ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार,महसूल वाढीच्या दृष्टीने एसटीने दरवर्षीप्रमाणे परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळ व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार, दिवाळीच्या हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. लाल परी, परिवर्तन, शिवसेरी, शिवशाही आदि सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीटांमध्ये १० टक्के भाडेवाढ केली आहे. यात सर्व सामान्य प्रवाशाला भाडेवाढ चा आर्थिक भुदंड मात्र नक्कीच बसणार आहे…