Sunday, December 22, 2024
Homeराज्यव्हाईस ऑफ मिडीयाचे एस.डी.ओं. मार्फत शासनास निवेदन...

व्हाईस ऑफ मिडीयाचे एस.डी.ओं. मार्फत शासनास निवेदन…

पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष…

४ जुलै ला झाले राज्यभर आंदोलन…

४ जुलै ला एस.डी.ओं. मार्फत दिले शासनास निवेदन…

रामटेक – राजू कापसे

पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने काल दि. ४ जुलै ला संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारले होते. त्या अनुषंगाने रामटेक तालुका शाखेच्या वतीने नुकतेच काल दि. ४ जुलै रोजी स्थानिक एस.डी.ओ. मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.

दैनिक, साप्ताहिक, टीव्ही, रेडिओ या वेगवेगळ्या विभागांतील पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी काल ४ जुलै ला व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने संपूर्ण राज्यभर काळ्या फिती लावुन आंदोलन करण्यात आले. मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधावे असा यामागचा उदात्त हेतु होता. शासन, राज्य सरकार छोट्या छोट्या दैनिकांना, साप्ताहिकांना सावत्रपणाची वागणूक देत आहे, हे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आले.

येत्या विधानसभा निवडणुकीला याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पत्रकार संघटना हजारो पत्रकारांना घेऊन ४ जुलै ला रस्त्यावर उतरले होते हे विशेष. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मागण्यांमध्ये एकुण १२ मागण्यांचा समावेश असुन त्याकडे शासनाने लक्ष देऊन त्या पुर्ण कराव्या अशी आशा बाळगण्यात आली आहे.

एस.डी.ओ. वंदना सवरंगपते यांनी मी आपले हे निवेदन शासनाकडे पाठवते असे यावेळी सांगितले. निवेदन देते वेळी व्हाईस ऑफ मिडीया पत्रकार संघटना शाखा रामटेक चे अध्यक्ष राजु कापसे, कोषाध्यक्ष रामरतन गजभिए, महासचिव पंकज बावनकर यांचेसह सदस्य सुरेंद्र बिरणवार, सचिन चौरसिया, प्रविण गिरडकर, प्रतिक डोंगरे आदी. उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: